Special Report | रघुनाथ कुचिक प्रकरणात चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर आमनेसामने
पुण्यातल्या कुचिक बलात्काराच्या आरोपात पुन्हा सरकार विरुद्ध विरोधकांचा सामना सुरु झालाय. हे प्रकरण आता थेट भाजप नेत्या चित्रा वाघ यांची नार्को टेस्ट करण्याच्या मागणीपर्यंत पोहोचलंय. पुण्यातल्या शिवसेनेच्या ज्या नेत्यावर बलात्काराचे आरोप झाले, त्यांच्या मुलीनं चित्रा वाघ यांच्या विरोधात महिला आयोगाची धाव घेतली.
पुण्यातल्या कुचिक बलात्काराच्या आरोपात पुन्हा सरकार विरुद्ध विरोधकांचा सामना सुरु झालाय. हे प्रकरण आता थेट भाजप नेत्या चित्रा वाघ यांची नार्को टेस्ट करण्याच्या मागणीपर्यंत पोहोचलंय. पुण्यातल्या शिवसेनेच्या ज्या नेत्यावर बलात्काराचे आरोप झाले, त्यांच्या मुलीनं चित्रा वाघ यांच्या विरोधात महिला आयोगाची धाव घेतली. त्यानंतर महिला आयोगानंही तातडीनं पावलं उचलली आहेत.
आता एका बलात्काराच्या आरोपात चित्रा वाघ यांची नार्को टेस्टची मागणी कशाला. तर त्याचं कारण बनलंय, चित्रा वाघ यांनी केलेले आरोप. त्याआधी हे प्रकरण नेमकं काय आहे, ते समजून घ्या. 17 फेब्रुवारीला पुण्यातल्या एका 24 वर्षीय मुलीनं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीत शिवसेना नेता रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा आरोप ठेवला गेला. आरोप करणाऱ्या तरुणीच्या तक्रारीनुसार कुचिक यांनी लग्नाचं आमिष दाखवून शारिरिक संबंध ठेवले. त्या संबंधातून तरुणी गर्भवती राहिली. मात्र नंतर गर्भपात करण्यासाठी कुचिक यांनी संबंधित तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर रघुनाथ कुचिक यांनी अटकपूर्व जामीन मिळवला. मात्र हे प्रकरण कोर्टात असताना चित्रा वाघ या मीडिया ट्रायल करत असल्याचा त्यांच्यावर आरोप होतोय. त्यामुळे आरोप करणारी तरुणी आणि तिच्यासह चित्रा वाघ यांचीही नार्को टेस्ट व्हावी, अशी मागणी कुचिक यांच्या मुलीनं केलीय. तर दुसरीकडे सरकारच बलात्काराच्या आरोपीला संरक्षण देत
असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केलाय.