Special Report | दहीहंडी उत्सव आणि कोरोना निर्बधांवरुन ठाकरे विरुद्ध ठाकरे!
ठाकरे सरकारकडून सणासुदीच्या काळात लादण्यात आलेल्या निर्बंधांच्या मुद्द्यावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कडाडून टीका केली. तुमची बाहेर पडायला फाटते, त्यामध्ये आमचा काय दोष, असा जळजळीत सवाल विचारत त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. सध्या तुम्हाला कुठेही बघितल्यावर कोरोनाचा प्रभाव जाणवत आहे का? मग उगाच इमारती सील करण्याचा किंवा सणांवर निर्बंध लादण्याची गरज नाही. त्यामुळे राज्यात सण साजरे करण्यास आणि मंदिरे उघडण्यास परवानगी दिलीच पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.
ठाकरे सरकारकडून सणासुदीच्या काळात लादण्यात आलेल्या निर्बंधांच्या मुद्द्यावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कडाडून टीका केली. तुमची बाहेर पडायला फाटते, त्यामध्ये आमचा काय दोष, असा जळजळीत सवाल विचारत त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. सध्या तुम्हाला कुठेही बघितल्यावर कोरोनाचा प्रभाव जाणवत आहे का? मग उगाच इमारती सील करण्याचा किंवा सणांवर निर्बंध लादण्याची गरज नाही. त्यामुळे राज्यात सण साजरे करण्यास आणि मंदिरे उघडण्यास परवानगी दिलीच पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. राज्य सरकारला नियम लावायचेच असतील तर मग ते सगळ्यांना एकसारखेच लावा. परंतु, सध्या सगळ्या राजकीय गोष्टी सुरळीत सुरु आहेत. जनआशीर्वाद यात्रा झाली, त्यानंतर निदर्शने झाली. नुकताच भास्कर जाधव यांच्या मुलाने मंदिरात अभिषेक केल्याचा व्हीडिओ मी पाहिला. मग त्यांच्यासाठी नियम आणि देव वेगळा का, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.