Special Report | काल आणि आज Raj Thackeray यांच्या भूमिका – Tv9
राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या उदयानंतर जातीय राजकारण वाढल्याचा आरोप पुन्हा केला. त्यानंतर यावरूनही जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत पुन्हा एक मोठा आरोप केला आहे.
राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या उदयानंतर जातीय राजकारण वाढल्याचा आरोप पुन्हा केला. त्यानंतर यावरूनही जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत पुन्हा एक मोठा आरोप केला आहे. देशामध्ये जाती-धर्माच्या नावाखाली समाजामध्ये दुफळी होईल याचा प्रयत्न असल्याचा आरोप पवारांनी पुन्हा केला आहे. काँग्रेसनेही राज ठाकरेंच्या त्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. यशमोमती ठाकूर यांनी राज ठाकरे यांना काही खोचक सवाल करत टीका केली आहे. सातत्याने येणार्या अपयशामुळे राज ठाकरे हे खचून गेले असून त्यांची वाटचाल आता धर्मांधतेच्या दिशेने सुरू आहे. राज ठाकरे यांनी विकासाच्या छाताडावर बसून धर्माचा झेंडा फडकवायचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.