Special Report | Sangli मध्ये Thackeray सरकारविरोधात Raju Shetti रस्त्यावर – Tv9
राज्यात वीजबिलाच्या मुद्दायवरून पुन्हा ठिणग्या उडत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यावरून चांगलेत आक्रमक झाले आहेत. हे सरकार लुटारूच्या पाठिशी उभा आहे. मुख्यमंत्री यांनी किती दिवस लुटारूच्या माघे उभे राहायचे याचा विचार करावा. अशी टीका राजू शेट्टी यांनी सरकारवर केली आहे.
सांगली : राज्यात वीजबिलाच्या मुद्दायवरून पुन्हा ठिणग्या उडत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यावरून चांगलेत आक्रमक झाले आहेत. हे सरकार लुटारूच्या पाठिशी उभा आहे. मुख्यमंत्री यांनी किती दिवस लुटारूच्या माघे उभे राहायचे याचा विचार करावा. अशी टीका राजू शेट्टी यांनी सरकारवर केली आहे. हे एक तर बेकायदेशीररित्या वागतात. कारखानदार, साखर आयुक्त त्यांच्यात ताटा खालचे मांजर झाले आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि राज्य मंत्री हे दोघे ही बेकायदेशीर ऊसामध्ये कपाती करतात. मग न्याय मागायचा कुठे? असा सवालही त्यांनी केला आहे. ज्या खाजगी वीजनिर्मिती कंपनी आहेत. चांदोलीला आहे, वीरला आहे. त्यांच्यामध्ये पवार कुटुंब चे शेअर्स नाहीत हे अजित पवार यांनी जाहीर करावे. तेवढे शेअर्स शेतकरी संघटनेला देणगी दिली तरी चालतील. आम्ही आणखी चांगल्या पद्धतीने कंपनी चालवू असा टोलाही त्यांनी लगावला आहे.