Special Report | EDच्या रडारवर Rashmi Thackeray यांचा भाऊ!-tv9

| Updated on: Mar 22, 2022 | 10:09 PM

आज सकाळपासून ईडीचे धाडसत्र सुरू आहे. यात मोठ्या कारवाईची शक्यता वर्तवण्यात येत होती आणि झालही तेच आहे. कारण आता मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याला ईडीने मोठा दणका दिला आहे, ठाण्यातल्या 11 सदनिका सील करण्यात आल्या आहेत.

ठाणे : आज सकाळपासून ईडीचे धाडसत्र सुरू आहे. यात मोठ्या कारवाईची शक्यता वर्तवण्यात येत होती आणि झालही तेच आहे. कारण आता मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याला ईडीने मोठा दणका दिला आहे, ठाण्यातल्या 11 सदनिका सील करण्यात आल्या आहेत. श्रीधर पाटणकर असे मुख्यमंत्र्यांच्या महुण्याचं नाव आहे,  ज्यांची ठाण्यातली संपत्ती ED ने जप्त केलीय. यात जवळपास 6.45 कोटींच्या सपत्तीला टाळा लावण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आलंय. महाराष्ट्रात सध्या ईडी अॅक्टिव्ह मोडवर आहे. पुष्पक बिलीयन फसवणूक प्रकरणात ईडीने हा मोठा दणका दिला आहे. यात ईडीने आधीही कोट्यवधी रुपयांची माहिती सोर आली आहे. यात ईडीने आधीच मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार हा तपास सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ईडीचे धाडसत्र सुरू आहे. यात अनेक मोठ्या कारवाई करण्यात आल्या आहेत.

Special Report | ‘मावळ’वरुन Shivsena – NCP मध्ये संघर्ष वाढणार?-tv9
भाजप आमदारांच्या मागणीमुळे अकृषिक कर रद्द झाला : Ashish Shelar