Special Report | Ukraine आर्मी नडतेय की पुतिनची रणनीती? – Tv9
सध्या दोन्ही देशांमध्ये वारंवार हल्ले सुरू असून त्यामध्ये अनेक सामान्य लोकांचे मृत्यू होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे युक्रेनमधील भीतीच्या सावटाखाली आहेत.
रशियाने युक्रेन मधील युद्धाचा आज पाचवा दिवस आहे, आत्तापर्यंत रशियाकडून युक्रेन देशाचं खूप मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळे तिथली परिस्थीती अत्यंत वाईट असल्याचे आपण व्हिडीओ पाहतोय. सध्या दोन्ही देशांमध्ये वारंवार हल्ले सुरू असून त्यामध्ये अनेक सामान्य लोकांचे मृत्यू होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे युक्रेनमधील भीतीच्या सावटाखाली आहेत. रशियाने युक्रेनविरुद्ध प्रतिबंधित थर्मोबॅरिक शस्त्रे वापरल्याचे दावा युक्रेनचे राजदूत ओक्साना मार्कोव्हा यांनी केला आहे. तसेच यामुळे शक्तीशाली स्फोट घडवण्यासाठी परिसरातील ऑक्सीजन शोषून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. जिनिव्हा करारानुसार थर्मोबॅरिक शस्त्रे पारंपारिक दारूगोळा बंदी असल्याचे देखील क्रेनचे राजदूत ओक्साना मार्कोव्हा यांनी म्हणटले आहे. त्यामुळे सध्याची युक्रेनमधील स्थिती अत्यंत वाईट असून दुस-या देशातील तिथं वास्तव करीत असलेली अनेक लोक तिथं अडकली आहेत. तसेच युक्रेनमधून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहेत.