Special Report | पुतीन आर्मीचं टार्गेट कीव आणि खारकीव का? – Tv9
रशिया-युक्रेन युद्धाचा आज सातवा दिवस आहे. चर्चेच्या फैरीनंतरही युक्रेनवरील हल्ले थांबलेले नाहीत. उलट आज सातव्या दिवशी रशियाने युक्रेनवरील हल्ले वाढवले आहेत. रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनमध्ये आतापर्यंत 13 बालकांसह कमीत कमी 136 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
क्यीव: रशिया-युक्रेन युद्धाचा आज सातवा दिवस आहे. चर्चेच्या फैरीनंतरही युक्रेनवरील हल्ले थांबलेले नाहीत. उलट आज सातव्या दिवशी रशियाने युक्रेनवरील हल्ले वाढवले आहेत. रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनमध्ये आतापर्यंत 13 बालकांसह कमीत कमी 136 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक सैनिकांचाही मृत्यू झाला असून शेकडो सैनिक जखमी झाले आहे. रशियातील हल्ल्यात घरे आणि इमारती उद्ध्वस्त झाल्या असून अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. लोक जीव वाचवण्यासाठी बंकर्समध्ये आणि रेल्वे स्थानकांवर राहत आहेत. आज सातव्या दिवशी तर खारक्यीव आणि सूमीमध्ये जोरदार हल्ले चढवण्यात आले आहेत. बॉम्ब हल्ले, मिसाईल अटॅक्स आणि अंधाधुंद गोळीबार यामुळे युक्रेनच्या अनेक शहरात आगडोंब उसळला असून नागरिकांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे. युक्रेनवरील हल्ल्याची ही दाहकता व्हिडीओतूनही पाहता येणार आहे.