Special Report | सुप्रिया सुळेंवर चंद्रकांत पाटलांची खोचक टीका, पती सदानंद सुळे चांगलेच संतापले!
खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही पाटील यांनी टीका केली. मात्र, सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना पाटील यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. पाटील यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील नेत्यांनी पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. बुधवारी भाजपने आक्रमक पवित्रा घेत मंत्रालयावर मोर्चा काढला. त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही पाटील यांनी टीका केली. मात्र, सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना पाटील यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. पाटील यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील नेत्यांनी पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. सोशल मीडियावरही पाटील यांच्याविरोधात जोरदार टीका सुरु आहे. अशावेळी पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत ग्रामीण पद्धतीने बोललो, कुणीही पराचा कावळा करु नये, असं आवाहन केलं आहे.
सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. ‘चंद्रकांत पाटील हे स्त्री द्वेषी आहेत. जिथे शक्य होईल तिथे महिलांचा अपमान करतात. मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे, ती गृहिणी आहे, ती आई आहे आणि यशस्वी राजकारणी आहे. देशातील इतर मेहनती आणि गुणवान महिलांप्रमाणे चंद्रकांत पाटील यांनी सर्वच महिलांचा अपमान केलाय’, असं मत सदानंद सुळे यांनी व्यक्त केलंय.