Special Report | BJP आणि Shivsena मधील लढाई जेलपर्यंत आली -Tv9
संजय राऊत यांच्या स्फोटक पत्रकार परिषदेनंतर मोहित कंबोज यांनी देखील पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं होतं. आज संजय राऊत यांनी बाप बेटे जेलमध्ये जाणार असं म्हणत सूचक ट्विट केलं आहे.
मुंबई: शिवेसना खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली होती. भाजप नेते देवेंद्र फडणवीस, माजी खासदार किरीट सोमय्या, निल सोमय्या, मोहित कंबोज यांच्यावर टीका केली होती. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत पीएमसी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी वाधवान याच्याशी निल सोमय्या याचा संबंध असल्याचा आरोप केला होता. मुंबई पोलिसांच्या ईओडबल्यूनं आणि आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरण विभागानं निकॉन इन्फ्रावर कारवाई करण्याबाबत विचारा करावा, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. संजय राऊत यांच्या स्फोटक पत्रकार परिषदेनंतर मोहित कंबोज यांनी देखील पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं होतं. आज संजय राऊत यांनी बाप बेटे जेलमध्ये जाणार असं म्हणत सूचक ट्विट केलं आहे. तर, मोहित कंबोज यांनी सलीम जावेदची जोडी जेलमध्ये जाणार असा आरोप मोहित कंबोज यांनी नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्यावर केला आहे.