Special Report | पंतप्रधान मोदींची झोप आणि ‘चमचा’वरुन भाजप-शिवसेनेत जोरदार टोलेबाजी

| Updated on: Apr 01, 2022 | 8:38 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसातल्या 24 तासांपैकी 22 तास काम करतात आणि यापुढे मोदी सध्या घेत असलेली दोन तासांची झोप सुद्धा घेणार नाहीत, तसा त्यांचा प्रयोग सुरु असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं होतं. त्यावर ही तर चमचेगिरीची हद्द असल्याचा जोरदार टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या झोपेबदद्ल चंद्रकांत पाटलांनी केलेल्या दाव्याला संजय राऊतांनी चमचेगिरी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसातल्या 24 तासांपैकी 22 तास काम करतात आणि यापुढे मोदी सध्या घेत असलेली दोन तासांची झोप सुद्धा घेणार नाहीत, तसा त्यांचा प्रयोग सुरु असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं होतं. त्यावर ही तर चमचेगिरीची हद्द असल्याचा जोरदार टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावलाय. दिवसातून फक्त दोन तास झोपं घेणं ही अशक्यप्राय आणि आरोग्याला हानीकारण गोष्ट आहे. हे खुद्द चंद्रकांत पाटलांनाही माहित असावं. मात्र चंद्रकांत पाटलांचा बोलण्याचा हेतू वेगळा होता. असा दावा प्रवीण दरेकरांनी केलाय.

Published on: Mar 27, 2022 11:50 PM
Special Report | काल दापोली, आज सांगली…BJP आक्रमक-tv9
Mumbai Bank बोगस मजूर प्रकरण; Pravin Darekar मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्याची शक्यता