Special Report | Sanjay Raut नेमकं कोणत्या साडे 3 नेत्यांना बरबाद करणार? -Tv9
शिवसेना नेते संजय राऊत यांनी उद्या भाजप विरोधात मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा दावा केला आहे. उद्या शिवसेनेची पत्रकार परिषद होईल. मीही असेल. शिवसेनेचे खासदार, आमदार, मंत्री आणि पदाधिकारी असतील. ही शिवसेनेची पत्रकार परिषद असेल.
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी उद्या भाजप विरोधात मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा दावा केला आहे. उद्या शिवसेनेची पत्रकार परिषद होईल. मीही असेल. शिवसेनेचे खासदार, आमदार, मंत्री आणि पदाधिकारी असतील. ही शिवसेनेची पत्रकार परिषद असेल. उद्या आम्ही बोलणार तेव्हा संपूर्ण देश ऐकेल. उद्या काय होतं ते बघाच. आता मी काहीच सांगणार नाही. उद्याच काय ते सांगू, असं सांगतानाच हमने बहोत बर्दाश्त किया है, अब बर्बादही हम करेंगे, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. संजय राऊत यांच्या या इशाऱ्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. त्यातच त्यांनी भाजपचे साडेतीन नेते लवकरच तुरुंगात असतील असा बॉम्बगोळा टाकल्याने भाजपचे ते तीन नेते कोण? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.