Special Report | संजय राऊतांचा मोदींवर निशाणा, नितेश राणेंशी सामना!
खासदार संजय राऊत यांनी आज अग्रलेख लिहून गुजरातच्या बदललेल्या मुख्यमंत्र्यावरुन भाजपवर टीका केली. त्यांच्या याच टीकेला आता भाजप आमदार नितेश राणे यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्या गुजरात मॉडेलवर बोलण्यापेक्षा मॉडेलवर बोला, असा सल्ला त्यांनी राऊतांना दिलाय. गुजरात राज्य जर विकास, प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होते, तर मग अशा पद्धतीने रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली?, असा सवाल आजच्या सामना अग्रलेखातून विचारला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज अग्रलेख लिहून गुजरातच्या बदललेल्या मुख्यमंत्र्यावरुन भाजपवर टीका केली. त्यांच्या याच टीकेला आता भाजप आमदार नितेश राणे यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्या गुजरात मॉडेलवर बोलण्यापेक्षा मॉडेलवर बोला, असा सल्ला त्यांनी राऊतांना दिलाय. गुजरात राज्य जर विकास, प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होते, तर मग अशा पद्धतीने रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली?, असा सवाल आजच्या सामना अग्रलेखातून विचारला आहे. कुठं काय बदलायचं हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. भाकरी ही फिरवावीच लागते, पण एखादे राज्य जेव्हा विकास किंवा प्रगतीचे ‘मॉडेल’ असल्याचे आदळआपट करीत सांगितले जाते, तेथे अचानक नेतृत्वबदल घडवला की, मग लोकांच्या मनात शंका निर्माण होतात, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.
गुजरातचा मुख्यमंत्री का बदलाल हा आमच्या पक्षाचा विषय आहे. आमच्या गुजरात मॉडेलवर बोलण्यापेक्षा तुम्ही मुंबई मॉडेलवर बोला ना… तुम्ही भर कोरोनाकाळात आयुक्त परदेशी यांची बदली का केली?, असा उलटसवाल नितेश राणे यांनी राऊत यांना विचारला. गुजरात मॉडेलपेक्षा मुंबई मॉडेलवर बोला ना…, आयुक्त परदेशीची का बदली केली होती ? मुंबई मॉडेलमध्ये इतके मृत्यू झालेलं आहेत. तुम्ही तुमच्या मुंबई मॉडेलवर बोलून जनतेच्या प्रश्नांची उत्तर द्या, असं नितेश राणे यांनी ट्विट करुन संजय राऊतांना डिवचलं आहे.