Special Report | आता UPAच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादीचा दावा!-tv9
राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात यूपीए अध्यक्षपदाच्या मुद्द्यावरुन महत्वाचा ठराव मंजूर करण्यात आला. यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे देण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं केली आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘द काश्मिर फाईल्स’च्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. ‘या चित्रपटामुळे एक विचार मारला जातोय. त्यात गांधीजी, नेहरू यांचा काय संबंध? यातून देशातलं बंधुप्रेम संपवलं जात आहे’, अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी केलीय. पवारांनी यापूर्वीही या चित्रपटाच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात यूपीए अध्यक्षपदाच्या मुद्द्यावरुन महत्वाचा ठराव मंजूर करण्यात आला. यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे देण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं केली आहे.
Published on: Mar 30, 2022 09:27 PM