Special Report |वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात आलं नसेल, राज्यपालांच्या वक्तव्यानंतर पवारांचा टोला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरुन जोरदार टोला हाणलाय. मी राज्यपालांचं विधान ऐकलं. ते म्हणाले सरकार मागणी करत नाही तर तुम्ही का विचारताय. पण पत्र गेलेलं आहे, वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात आलं नसेल, असा टोला शरद पवार यांनी राज्यपालांना लगावला आहे. शरद पवार आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडी आणि राज्यपालांचा संघर्ष अद्यापही सुरुच आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरुन जोरदार टोला हाणलाय. मी राज्यपालांचं विधान ऐकलं. ते म्हणाले सरकार मागणी करत नाही तर तुम्ही का विचारताय. पण पत्र गेलेलं आहे, वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात आलं नसेल, असा टोला शरद पवार यांनी राज्यपालांना लगावला आहे. शरद पवार आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.