Special Report | भाजपच्या कार्यालयावर दगडफेक करणारे राऊतांसोबत !
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर नाशिकमध्येही आंदोलन झालं. काही शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयावर दगडफेक केली. त्याविरोधात भाजप पदाधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे. नाशिक पोलिसांकडून या शिवसैनिकांचा शोध सुरु होता. पण हे शिवसैनिक नाशिक पोलिसांच्या हाती काही लागले नाहीत. दुसरीकडे राऊतांसोबत मात्र हे दोन्ही शिवसैनिक त्यांच्या मागे उभे असल्याचं पाहायला मिळालं.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर नाशिकमध्येही आंदोलन झालं. काही शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयावर दगडफेक केली. त्याविरोधात भाजप पदाधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे. नाशिक पोलिसांकडून या शिवसैनिकांचा शोध सुरु होता. पण हे शिवसैनिक नाशिक पोलिसांच्या हाती काही लागले नाहीत. दुसरीकडे राऊतांसोबत मात्र हे दोन्ही शिवसैनिक त्यांच्या मागे उभे असल्याचं पाहायला मिळालं. या शिवसैनिकांना अटकपूर्व जामीनही मिळाला आहे. मात्र, त्यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यापूर्वी हे शिवसैनिक पोलिसांच्या हाती कसे लागले नाहीत? असा सवाल भाजपनं उपस्थित केलाय.