Special Report | अमित शाह यांच्या आव्हानाला शिवसेनेचं प्रतिआव्हान

| Updated on: Dec 20, 2021 | 10:56 PM

सत्तेसाठी 2014मध्ये शिवसेनेला दूर ठेवण्याचा भाजपचा डाव होता. आम्ही सत्तेसाठी हपापलो नव्हतो तर तुम्हीच आमच्याविरोधात कट कारस्थान रचत होता, असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे. राऊत यांनी हा आरोप हवेत केलेला नाही. तर 2014 मध्ये भाजपच्याच एका नेत्याने शिवसेनेला भाजपच्या कटाची माहिती दिली होती. त्यामुळेच संजय राऊत यांनी थेट भाजपवर हा आरोप करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आव्हानच दिलं आहे.

सत्तेसाठी 2014मध्ये शिवसेनेला दूर ठेवण्याचा भाजपचा डाव होता. आम्ही सत्तेसाठी हपापलो नव्हतो तर तुम्हीच आमच्याविरोधात कट कारस्थान रचत होता, असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे. राऊत यांनी हा आरोप हवेत केलेला नाही. तर 2014 मध्ये भाजपच्याच एका नेत्याने शिवसेनेला भाजपच्या कटाची माहिती दिली होती. त्यामुळेच संजय राऊत यांनी थेट भाजपवर हा आरोप करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आव्हानच दिलं आहे, असं सूत्रांनी सांगितलं.

अमित शहा काल पुण्यात होते. यावेळी त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला. हा संवाद साधत असतानाच शिवसेनेवरही हल्ला चढवला. 2019मध्ये महाराष्ट्रात निवडणुका होत्या. त्यावेळी मी स्वत: इथे आलो होतो. मी स्वत: शिवसेनेशी संवाद साधला. तेव्हा फडणवीसांच्या नेतृत्वातच निवडणुका लढायचं ठरलं होतं. मुख्यमंत्रीही भाजपचाच होणार हे सुद्धा ठरलं होतं. पण शिवसेना फिरली. त्यांनी हिंदुत्वाशीही तडजोड केली. दोन पिढ्यांपासून ज्यांच्याविरोधात लढले त्यांच्याच मांडीवर जाऊन बसेल आणि म्हणतात आम्ही असं म्हणालोच नाही, असा हल्ला शहा यांनी चढवला होता.

 

Gunratna Sadavarte | एसटी संप मागे मात्र गुणरत्न सदावर्ते आझाद मैदानात
Aishwarya Rai Bachchan ED Inquiry | ऐश्वर्या राय बच्चनची 6 तास चालली ED चौकशी