Special Report | भर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांची जोरदार टोलेबाजी

| Updated on: Aug 28, 2021 | 10:10 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपला आक्रमक स्वभाव, रोखठोक मतं, सडेतोड उत्तर देण्याची पद्धत आणि एखाद्याला दरडावण्याची स्टाईल यामुळे प्रचलित आहे. जे मनात तेच तोंडावर असा अजित पवारांचा स्वभाव आहे. त्यांच्या या स्वभावामुळे ते अनेकदा अडचणीतही आले. मात्र त्यांचा हाच स्वभाव त्यांच्या लोकप्रियतेचं खरं गमक आहे. आज बारामतीमध्ये जानाई उजव्या कालव्याच्या पाईपलाईनचं भूमीपूजन अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांच्या खुमासदार आणि आक्रमक भाषणशैलीचा प्रत्यय आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपला आक्रमक स्वभाव, रोखठोक मतं, सडेतोड उत्तर देण्याची पद्धत आणि एखाद्याला दरडावण्याची स्टाईल यामुळे प्रचलित आहे. जे मनात तेच तोंडावर असा अजित पवारांचा स्वभाव आहे. त्यांच्या या स्वभावामुळे ते अनेकदा अडचणीतही आले. मात्र त्यांचा हाच स्वभाव त्यांच्या लोकप्रियतेचं खरं गमक आहे. आज बारामतीमध्ये जानाई उजव्या कालव्याच्या पाईपलाईनचं भूमीपूजन अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांच्या खुमासदार आणि आक्रमक भाषणशैलीचा प्रत्यय आला. आपल्या भाषणात अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली. त्याच बरोबर अजित पवार यांनी आज पियाजो कंपनीची इलेक्ट्रिक रिक्षाही चालवली.

Special Report | भविष्यात भाजप-शिवसेना युतीसाठी जागा कायम आहे का?
Special Report | लढणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप!