Special Report | खरंच एसटीचं खासगीकरण होणार आहे का ?
एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. अशा परिस्थितीत हे आंदोलन आता नेतृत्वहीन झालंय. चर्चा नेमकी कुणाशी करायची? ना ते युनियनचं ऐकतात ना भाजप नेत्यांचं, अशी मत अनिल परब यांनी व्यक्त केलंय. दरम्यान, खासगीकरणाचा सरकारचा विचार नाही, पण तो एक पर्याय आहे, असं परब म्हणाले.
ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात शेकडो एसटी कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानात ठाण मांडून आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून सातत्याने चर्चेसाठी आवाहन केलं जात आहे. मात्र, एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. अशा परिस्थितीत हे आंदोलन आता नेतृत्वहीन झालंय. चर्चा नेमकी कुणाशी करायची? ना ते युनियनचं ऐकतात ना भाजप नेत्यांचं, अशी मत अनिल परब यांनी व्यक्त केलंय. दरम्यान, खासगीकरणाचा सरकारचा विचार नाही, पण तो एक पर्याय आहे, असं परब म्हणाले.
कालच्या बैठकीत एसटी रुळावर आणण्यासाठी विविध पर्यायांचा विचार केला. संबंधित कंपनीला सूचना दिल्या आहेत. एसटीच्या खासगीकरणाचा विचार नाही. तो एक पर्यात आहे. विलिनीकरणाबाबतचा निर्णय समितीच घेईल, असं अनिल परब यांनी स्पष्ट केलंय. तसंच चर्चा नेमकी कुणाशी करायची? ना ते युनियनचे ऐकतात ना भाजप नेत्यांचं. हे आंदोलन आता नेतृत्वहीन झालंय. कामगारांनी सांगावं कुणाशी चर्चा करायची. आम्ही त्यांच्याशी बोलायला तयार आहोत, असंही परब म्हणाले.