Special Report | एसटी संपाच्या लढ्यात उद्या मोठा दिवस ?
परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला गाठला. यावेळी त्यांनी फडणवीसांसोबत एसटी कामगारांच्या संपावर चर्चा केली. कोर्टाचे आदेश आणि एसटीची आर्थिक स्थिती यावरही या बैठकीत चर्चा झाली. यावेळी अनिल परब यांनी चर्चेच्या तोडग्याचा फॉर्म्युला देण्याचं ठरल्याचं सांगितलं जातं. पगाराचा मुद्दा कसा सोडवायचा याबाबतच्या काही सूचना फडणवीस यांनी परब यांना दिल्या असून ही बैठक सकारात्मक झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला गाठला. यावेळी त्यांनी फडणवीसांसोबत एसटी कामगारांच्या संपावर चर्चा केली. कोर्टाचे आदेश आणि एसटीची आर्थिक स्थिती यावरही या बैठकीत चर्चा झाली. यावेळी अनिल परब यांनी चर्चेच्या तोडग्याचा फॉर्म्युला देण्याचं ठरल्याचं सांगितलं जातं. पगाराचा मुद्दा कसा सोडवायचा याबाबतच्या काही सूचना फडणवीस यांनी परब यांना दिल्या असून ही बैठक सकारात्मक झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आज एसटी कामगारांच्या शिष्टमंडळासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर अनिल परब यांनी सागर बंगल्यावर जाऊन फडणवीस यांची भेट घेतली. नंतर परब यांनी मीडियाशी संवाद साधला. एसटी कर्मचाऱ्यांशी आजही चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत. फडणवीसांनीही या अनुषंगाने काही सूचना केल्या आहेत. त्या सूचनांचा आम्ही जरूर विचार करू. चर्चा सकारात्मक करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं परब म्हणाले.