Special Report | विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊ नेमका आहे तरी कोण?

| Updated on: Jan 31, 2022 | 10:01 PM

हिंदुस्तानी भाऊचे नाव विकास पाठक असे आहे. या हिंदुस्तानी भाऊने विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोप आहे. हिंदुस्तानी भाऊ बिग बॉसच्या सीझन 13 मध्येही दिसून आला होता. त्याआधी सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडिओ आहेत. ज्यामध्ये तो अश्लाघ्य भाषा वापरण्यासाठी फेमस आहे. शिक्षमंत्र्यांनी माझं म्हणनं ऐकून घेतलं नाही असा आरोप विकास पाठक ऊर्फ हिंदुस्तानी भाऊने केला आहे.

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन स्वरुपातच घेण्यात यावी या मागणीसाठी आज राज्यभरात विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. धारावीमध्ये शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर शेकडो विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. त्यावेळी पोलिसांकडून या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. मुंबईसह नागपूर, औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांमध्येही आज दहावी आणि बारावीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले. त्यामुळे मोठा गोंधळ पाहायला मिळाला. महत्वाची बाब म्हणजे या आंदोलनामागे हिंदुस्तानी भाऊ या नावाने परिचित असलेला विकास पाठक हा व्यक्ती असल्याचं पहायला मिळत आहे. हिदुस्तानी भाऊ हा अनेक प्रकारे सोशल मीडियावर चर्चेत असतो. यावेळी पहिल्यांदाच तो विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं.

कोण आहे हिंदुस्तानी भाऊ?

या हिंदुस्तानी भाऊचे नाव विकास पाठक असे आहे. या हिंदुस्तानी भाऊने विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोप आहे. हिंदुस्तानी भाऊ बिग बॉसच्या सीझन 13 मध्येही दिसून आला होता. त्याआधी सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडिओ आहेत. ज्यामध्ये तो अश्लाघ्य भाषा वापरण्यासाठी फेमस आहे. शिक्षमंत्र्यांनी माझं म्हणनं ऐकून घेतलं नाही असा आरोप विकास पाठक ऊर्फ हिंदुस्तानी भाऊने केला आहे. यावेळी टिव्ही 9 शी बोलताना विकास पाठक ऊर्फ हिंदुस्तानी भाऊला भेटण्यासाठी वेळ देईन असेही आश्वासन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहे.

Special Report | भाजप आमदार नितेश राणे यांचं नेमकं काय होणार? उद्या निर्णय
TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 9 PM | 31 January 2022