Special Report | मोबाईल अॅपवर मुस्लिम महिलांच्या फोटोचा लिलाव ?
नवाब मलिक यांनी सुल्ली डील अॅपवर मुस्लीम महिलांचे फोटे अपलोड करुन त्यांची किंमत दिली जात असल्याची धक्कादायक माहिती दिली. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. मलिक यांच्या माहितीनंतर राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या महिलांसंबंधीची माहिती वेगवेगळ्या समाजमाध्यमांवरुन काढून टाकण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच महिलांच्या माहितीचा प्रसार करण्यासाठी मदत करणाऱ्या ‘गिटहब’ या प्लॅटफॉर्मवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी सुल्ली डील अॅपवर मुस्लीम महिलांचे फोटे अपलोड करुन त्यांची किंमत दिली जात असल्याची धक्कादायक माहिती दिली. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. मलिक यांच्या माहितीनंतर राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या महिलांसंबंधीची माहिती वेगवेगळ्या समाजमाध्यमांवरुन काढून टाकण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच महिलांच्या माहितीचा प्रसार करण्यासाठी मदत करणाऱ्या ‘गिटहब’ या प्लॅटफॉर्मवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
मलिक यांनी सुल्ली डील अॅपवर मुस्लीम महिलांचे फोटे अपलोड करुन त्यांची किंमत दिली जात असल्याची धक्कादायक माहिती दिली. त्यानंतर या प्रकरणाची राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील-यांनी तात्काळ दखल घेतली आहे. त्यांनी पोलीस प्रशासनाला तातडीने तपास करून कारवाई करण्याचे आदेश दिली आहे. महिला आयोगानेही याची गंभीर दखल घेतली आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. तसेच CID मुंबई येथेही गुन्हा दखल करण्यात आला आहे, एका विशिष्ट समाजातील महिलांना अशा प्रकारे टार्गेट करणे दुर्दैवी आहे. याचा तपास करुन पुढील कारवाई तातडीने केली जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे.