Special Report | दहशतवादी ओसामाचा बाप दुबईतून ISI च्या संपर्कात !
मंगळवारी एकाच वेळ सहा दहशतवादी दिल्ली पोलिसांच्या हाती लागले. आणि त्यानंतर आता एक एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. भारताला हादरवण्याचा प्लॅन बाप आणि मुलानं दुबईतून आखला होता. अटकेत असलेल्या दहशतवादांचं दाऊद कनेक्शनही आता उजेडात आलं आहे. दिल्ली पोलिसांनी एकूण सहा आरोपींना अटक केलं असून त्यांची उत्तर प्रदेश, महाराष्ट्र तसेच दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना होती. या संशयित दहशतवाद्यांना महाराष्ट्र तसेच उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आलंय.
मंगळवारी एकाच वेळ सहा दहशतवादी दिल्ली पोलिसांच्या हाती लागले. आणि त्यानंतर आता एक एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. भारताला हादरवण्याचा प्लॅन बाप आणि मुलानं दुबईतून आखला होता. अटकेत असलेल्या दहशतवादांचं दाऊद कनेक्शनही आता उजेडात आलं आहे. दिल्ली पोलिसांनी एकूण सहा आरोपींना अटक केलं असून त्यांची उत्तर प्रदेश, महाराष्ट्र तसेच दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना होती. या संशयित दहशतवाद्यांना महाराष्ट्र तसेच उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आलंय. अटक करण्यात आलेल्यांपैकी दोघांची नावे ओसामा आणि जिशान अशी आहेत. यातील दोन संशयित दहशतवादी पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेऊन आल्याचेही सांगण्यात येत आहे.
अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा संबंध अंडरवर्ल्डशी असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच यातील दोन दहशतवादी डी- गँगशी संबंधित असल्याचीही माहिती मिळतेय. सध्या देशात सणांची धूम आहे. गणेशोत्सव, नवरात्री या सणांमुळे देशात अनेक ठिकाणी गर्दी होते. याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर बॉम्बस्फोट घडवण्याची दहशतवाद्यांची तयारी होती.