Special Report | बुलेट ट्रेनसाठी जागा हस्तांतरणाचा वाद पेटणार?
शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाणे महापालिकेनं बुलेट ट्रेनसाठी जागा हस्तांतरणाच्या ठरावाला मंजुरी दिली आहे. मात्र या मंजुरीवरून महाविकास आघाडी सरकारमध्ये आता मतभेद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. कारण, ठरावा मंजुरी ही शिवसेना सत्तेत असलेल्या महापालिकेनं दिली आहे, महाविकास आघाडी सरकारनं नाही, असं खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. त्यामुळे बुलेट ट्रेनवरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाणे महापालिकेनं बुलेट ट्रेनसाठी जागा हस्तांतरणाच्या ठरावाला मंजुरी दिली आहे. मात्र या मंजुरीवरून महाविकास आघाडी सरकारमध्ये आता मतभेद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. कारण, ठरावा मंजुरी ही शिवसेना सत्तेत असलेल्या महापालिकेनं दिली आहे, महाविकास आघाडी सरकारनं नाही, असं खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. त्यामुळे बुलेट ट्रेनवरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. महत्वाची बाब म्हणजे ज्या ठाणे महापालिकेनं बुले ट्रेनसाठी जागा हस्तांतरणाच्या ठरावा मंजुरी दिली आहे, त्याच महापालिकेनं यापूर्वी हा ठराव 3 वेळा धुडकावून लावला होता. मात्र यावेळी कोणत्याही चर्चेविना जमीन हस्तांतरणासाठी मंजुरी दिली गेलीय.
दरम्यान, मुंबई-अहमदाबाद बुले ट्रेनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विरोध राहिला आहे. मुंबईत बुलेट ट्रेनची एकही विट रचली जाणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यामुळे ठाणे महापालिकेनं हा ठराव मंजुर केल्यानंतर आता महाविकास आघाडीत सत्तेत असलेली शिवसेना काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.