Special Report | दुसऱ्या लाटेत बेड मिळत नव्हते, यावेळी बेड रिकामे ?

| Updated on: Jan 11, 2022 | 10:06 PM

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुणे देशातलं सर्वात मोठं हॉटस्पॉट बनलं होतं. एका दिवसात जितके रुग्ण पुण्यात निघत होते, तितके रुग्ण देशातल्या कोणत्याही शहरात सापडत नव्हते. हॉस्पिटल आणि ऑक्सिजन बेड न मिळाल्यामुळे पुण्यातच सर्वाधिक मृत्यूच्या घटना घडल्या. यावेळी सुद्धा मुंबईपाठोपाठ पुण्यात रुग्णवाढ झालीय. मात्र रुग्ण दाखल होण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे अद्याप तरी आरोग्य यंत्रणा सुरळीत आहे.

25 डिसेंबरच्या दरम्यान पुण्यात एका दिवसाला सरासरी 300 रुग्ण निघायचे, आता रोज पुण्यात 4 हजारांहून जास्त रुग्ण निघत आहेत. जी सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजारांहून खाली होती, ती आता 17 हजारांवर गेलीय. पुण्यात दिवसाला अंदाजे 18 हजार चाचण्या होत आहेत. 8 तारखेला पुण्यात 2 हजार 471 रुग्ण आले, 9 तारखेला 4 हजार 29 आणि 10 तारखेला 3 हजार 67 रुग्ण निघाले. यातली दिलासादायक गोष्ट म्हणजे पुण्यातल्या 17 हजार रुग्णांपैकी तब्बल 16 हजार 236 रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. या सर्व रुग्णांना कोणतीही मोठी लक्षणं नाहीत. पुण्यातल्या दवाखान्यांमध्ये फक्त 862 लोक अॅडमिट झाली आहेत.

Special Report | मुंबईत सलग चौथ्या दिवशी रुग्ण कमी येण्याचं कारण काय ?
आमदार निलंबन प्रकरण : आमचा न्यायालयावर विश्वास; न्याय नक्की मिळणार – शेलार