Special Report | टीईटी परिक्षेत पेपरफुटीचे तार, तुकाराम सुपेंच्या घरी सापडलं 2 कोटींचं घबाड

| Updated on: Dec 20, 2021 | 10:48 PM

पुणे सायबर पोलिसांनी महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकर यांच्यासह आणखी एकाला अटक केली होती. पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेच्या घरावर आणि त्याच्या मेव्हण्याच्या घरावर छापा टाकला. पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेच्या घरातून 2 कोटी आणि सोनंही सापडलं असल्याची माहिती आहे.

पुणे सायबर पोलिसांच्या चौकशीत आरोग्य भरती प्रक्रियेतील पेपर फुटीनंतर तपास सुरु केला होता. त्या दरम्यान त्यांना म्हाडा परीक्षेचा पेपर फोडला जाणार असल्याची लिंक लागली. याचा तपास करताना महाटीईटी परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचं समोर आलं. पुणे सायबर पोलिसांनी महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकर यांच्यासह आणखी एकाला अटक केली होती. पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेच्या घरावर आणि त्याच्या मेव्हण्याच्या घरावर छापा टाकला. पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेच्या घरातून 2 कोटी आणि सोनंही सापडलं असल्याची माहिती आहे.

पुणे पोलिसांना तुकारामा सुपेच्या घरात 2 कोटी रुपये सापडल्याची माहिती आहे. पुणे पोलिसांनी सोनं देखील जप्त केलं आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी अद्याप तपास सुरु आहे, अशी माहिती अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

यापुर्वी तुकाराम सुपे याच्या घरातून 88 लाख 49 हजार 980 रोख, पाच ग्राम सोन्याचे नाणे, 5 लाख 50000 हजार रुपयांची एफ डी केल्याची कागदपत्रे जप्त केली आहेत. याशिवाय सुपेने त्याच्या मित्राला लाखो रुपये दिल्याचेही माहिती मिळाली आहे, असं पुणे पोलिसांनी सांगितलं आहे.

ShivendraRaje Bhosale | उदयनराजे भोसले अफाट बुद्धीचे म्हणून हातची खासदारकी सोडली-शिवेंद्रराजे
Chandrakant Patil | पेपर फुटीबाबत CBI चौकशी व्हावी, पाळंमुळं राजकीय व्यक्तीपर्यंत पोहोचली-पाटील