Special Report | अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम मुंबईत पुन्हा अ‍ॅक्टिव्ह?

| Updated on: Feb 16, 2022 | 11:46 PM

मोस्ट वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. मुंबईत दाऊद पुन्हा अॅक्टिव्ह झाला असून दाऊदचे हस्तक आजही त्याच्यासाठी काम करत असल्याची माहिती केंद्रीय तपास यंत्रणांना मिळालीय. दाऊदसाठी काम करणारे 4 ते 5 हस्तक ईडीच्या रडारवर आलेत आणि त्यातूनच छापेमारी सुरु झाली. मुंबईत संपत्ती जप्त झाल्यानंतर दाऊदनं पुन्हा हस्तकांच्या आणि निकटवर्तीयांच्या माध्यमातून प्रॉपर्टी उभी केल्याची माहितीही सूत्रांची दिलीय.

मोस्ट वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. मुंबईत दाऊद पुन्हा अॅक्टिव्ह झाला असून दाऊदचे हस्तक आजही त्याच्यासाठी काम करत असल्याची माहिती केंद्रीय तपास यंत्रणांना मिळालीय. दाऊदसाठी काम करणारे 4 ते 5 हस्तक ईडीच्या रडारवर आलेत आणि त्यातूनच छापेमारी सुरु झाली. मुंबईत संपत्ती जप्त झाल्यानंतर दाऊदनं पुन्हा हस्तकांच्या आणि निकटवर्तीयांच्या माध्यमातून प्रॉपर्टी उभी केल्याची माहितीही सूत्रांची दिलीय. हवाला रॅकेटच्या माध्यमातून दाऊद पाकिस्तानातून डी गँग ऑपरेट करतोय. रियल इस्टेट आणि हवाला ऑपरेशन सांभाळणारे, दाऊदचे 4 ते 5 हस्तक मुंबईत आहेत. बेटिंगच्या माध्यमातूनही दाऊदच्या हस्तकांची कमाई सुरु आहे. त्यामुळं ईडीनं तपासाची चक्र फिरवलीय. आधी अंडरवर्ल्डशी संबंधित ठिकाणांसह दाऊची बहीण हसीना पारकरच्या घरी ईडीचे छापे पडले…आणि आता दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरही ईडीच्या कोठडीत येणार आहे. ईडीनं मागणी केल्याप्रमाणं, मुंबईत सत्र न्यायालयाच्या PMLA कोर्टानं इकबाल कासकरचा ताबा ईडीकडे देण्यास मंजुरी दिलीय..प्रोडक्शन वॉरंट जारी करण्यात आलं असून ठाणे सेंट्रल जेलमधून त्याचा ताबा ईडीचे अधिकारी घेतील.

मिलिंद नार्वेकर तिकीट विकणारा एजंट, निलेश राणे यांचा घणाघात
Aurangabad | औरंगाबाद मधील क्रांती चौकात मध्यरात्री शिवप्रेमी आक्रमक, बॅनर हटवल्याचं प्रकरण