Special Report | अरविंद केजरीवाल यांचा फॉर्म्युला अखिलेश यादव यांना उत्तर प्रदेशात विजयाच्या जवळ घेऊन जाणार?
निवडणुकीत वायदा केल्याप्रमाणं दिल्लीत केजरीवाल 200 यूनिटपर्यंत वीज मोफत देत आहेत. त्यामुळं दिल्लीत 73 टक्के म्हणजेच जवळपास 2 कोटी 19 लाख नागरिकांना वीज बील शून्य येतं. त्यातच आता पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यातही 300 यूनिटपर्यंत वीज मोफत देण्याची घोषणा केजरीवालांनी केली आहे. वीज मोफत देण्याचा केजरीवालांचा फॉर्म्युला दिल्लीत हिट ठरला आहे. त्यामुळं केजरीवालांनी 2020 च्या निवडणुकीत 70 पैकी 62 जागा दणक्यात जिंकल्या. आता योगींना रोखण्यासाठी अखिलेश यादवांनीही तोच फॉर्म्युला वापरल्याचं पाहायला मिळतंय.
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केलीय. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत त्यांची ही घोषणा मास्टरस्ट्रोक मानली जातेय. समाजवादी पार्टीचं सरकार आल्यावर, घरगुती वीज ग्राहकांना 300 यूनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा वायदा अखिलेश यादवांनी केलाय.
दरम्यान, मोफत वीजेचा हा फॉर्म्युला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आहे. निवडणुकीत वायदा केल्याप्रमाणं दिल्लीत केजरीवाल 200 यूनिटपर्यंत वीज मोफत देत आहेत. त्यामुळं दिल्लीत 73 टक्के म्हणजेच जवळपास 2 कोटी 19 लाख नागरिकांना वीज बील शून्य येतं. त्यातच आता पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यातही 300 यूनिटपर्यंत वीज मोफत देण्याची घोषणा केजरीवालांनी केली आहे. वीज मोफत देण्याचा केजरीवालांचा फॉर्म्युला दिल्लीत हिट ठरला आहे. त्यामुळं केजरीवालांनी 2020 च्या निवडणुकीत 70 पैकी 62 जागा दणक्यात जिंकल्या. आता योगींना रोखण्यासाठी अखिलेश यादवांनीही तोच फॉर्म्युला वापरल्याचं पाहायला मिळतंय.
तसंही यूपीच्या निवडणुकीत काय होईल काही सांगता येत नाही. मुलायम सिंह यादवांची लहान सून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा जोरात सुरु आहे. विशेष म्हणजे अर्पणा यादवांनी याआधी बरेचदा योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जाहीर कौतुकही केलंय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी अपर्णा यादवांना Y दर्जाची सुरक्षाही दिलेली आहे. अपर्णा यादवांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर अखिलेश यादवांनी भाजपवर टीका करत, निवडणुका जिंकण्यासाठी भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप केलाय.