Special Report | उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांची मोठी खेळी…अपर्णांवरून ‘यादवी’!
मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा प्रतीक यांच्या अपर्णा यादव पत्नी आहेत. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव हे मुलायम यांच्या पहिल्या पत्नीचे पुत्र आहेत. अपर्णा यादव यांनी 2017 मध्ये लखनऊ कँट मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र भाजपच्या रिटा बहुगुणा जोशी यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर रिटा बहगुणा लोकसभा निवडणूक जिंकत खासदार बनल्या.
अपर्णा यादव आणि प्रियंका मौर्या…उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपनं समाजवादी पार्टीलाही धक्का दिला आणि काँग्रेसलाही. मुलायम सिंह यादवांची धाकटी सूनच समाजवादी पार्टीतून भाजपमध्ये आलीय. तर उत्तर प्रदेश काँग्रेसची पोस्टर गर्ल प्रियंका मौर्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. अपर्णा यादवांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं, समाजवादी पार्टीच्या घरातच यादवी निर्माण झालीय.
मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा प्रतीक यांच्या अपर्णा यादव पत्नी आहेत. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव हे मुलायम यांच्या पहिल्या पत्नीचे पुत्र आहेत. अपर्णा यादव यांनी 2017 मध्ये लखनऊ कँट मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र भाजपच्या रिटा बहुगुणा जोशी यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर रिटा बहगुणा लोकसभा निवडणूक जिंकत खासदार बनल्या.
भाजपच्या विचारधारेवर मी नेहमीच प्रभावित राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्य यांचे मी आभार मानते. माझ्या क्षमतेनुसार जी जबाबदारी सोपवाल ती मी पूर्ण करेल. राष्ट्रधर्म माझ्यासाठी सर्वात मोठा आहे. मला राष्ट्रासाठी काम करायचं आहे, असं पक्षप्रवेश केल्यानंतर अपर्णा यादव यांनी भाजप पक्षप्रवेशावेळी सांगितलं.