Special Report | वंचित बहुजन आघाडीची एमआयएमशी फारकत, कोणाला फायदा?

| Updated on: Dec 13, 2021 | 9:54 PM

वंचित बहुजन आघाडी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. वंचितने मुंबई महापालिकेत इंडियन मुस्लिम लीग आणि लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या आघाडीची घोषणा केली आहे. एमआयएमसोबत आघाडी होणार नाही. शिवसेना आणि काँग्रेसला आमचे दरवाजे उघडे आहेत, असंही प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केलं.

वंचित बहुजन आघाडी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. वंचितने मुंबई महापालिकेत इंडियन मुस्लिम लीग आणि लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या आघाडीची घोषणा केली आहे. एमआयएमसोबत आघाडी होणार नाही. शिवसेना आणि काँग्रेसला आमचे दरवाजे उघडे आहेत, असंही प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केलं. आंबेडकर यांनी नव्या समीकरणासाठी पर्याय खुले केल्याने त्यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.

प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मुस्लिम लीग आणि राजद सोबत आमची आघाडी झाली असल्याचं स्पष्ट केलं आहे. इतर पक्ष संघटनाही या आघाडीत भविष्यात येऊ शकतात. काही पक्ष, संघटनांसोबत चर्चाही सुरू आहे. जानेवारीच्या मध्यापर्यंत आमचे जागा वाटप पूर्ण होईल, असं आंबेडकरांनी स्पष्ट केलं. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत एमआयएम बरोबर युती करण्याचा विचार नाही. शिवसेना वा काँग्रेससाठीही आमचे दार उघडे आहेत, असे एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केलं.

Special Report | पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस – शरद पवारांमध्ये नवा सामना
Special Report | संजय राऊतांवर गुन्हा दाखल, भाजपची माफीची ऑफर?