Special Report | भविष्य खरं ठरणार? जगाचा ‘सम्राट’ बदलणार? -Tv9
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबद्दल बल्गेरियाचे अंध गूढवादी बाबा वेंगा यांची भविष्यवाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 11 सप्टेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे अचूक भाकीत करणाऱ्या बाबा वांगे यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन एक दिवस जगावर राज्य करतील असे म्हटले होते.
रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनमध्ये नासधूस केली असून मोठे नुकसान केले आहे. युक्रेनची राजधानी कीवसह देशातील अनेक शहरांतील इमारतींसह मालमत्तेचे नुकसान झाले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची हुकूमशाही वृत्ती जग पाहत आहे. आता रशिया पुन्हा एकदा जगाचा राजा होणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. यातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबद्दल बल्गेरियाचे अंध गूढवादी बाबा वेंगा यांची भविष्यवाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 11 सप्टेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे अचूक भाकीत करणाऱ्या बाबा वांगे यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन एक दिवस जगावर राज्य करतील असे म्हटले होते. असे मानले जाते की त्यांचे स्वतःचे अंदाज 85 टक्के खरे ठरले.