Special Report |अधिवेशनाच्या अखेर Uddhav Thackeray आणि Devendra Fadnavis यांच्यात शाब्दिक चकमक-tv9

| Updated on: Mar 25, 2022 | 10:07 PM

यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरलंय. या अधिवेशनात विविध मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. अधिवेशनाच्या सुरूवातीलाच नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी गाजली तर अधिवेशनाच्या शेवटच्या दोन दिवसात मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांच्यातली खडजंगी गाजली.

यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरलंय. या अधिवेशनात विविध मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. अधिवेशनाच्या सुरूवातीलाच नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी गाजली तर अधिवेशनाच्या शेवटच्या दोन दिवसात मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांच्यातली खडजंगी गाजली. त्यात अजित पवार यांनी अर्थसकर्प मांडताना काही महत्वाच्या मोठ्या घोषणाही केल्या. या अधिवेशनात दोन्ही सभागृहात एकूण 17 विधेयके संमत करण्यात आली. अधिवेशादरम्यान देवेंद्र फडणवीसांनी अनेक भ्रष्टाचाराचे आरोप केले. तर काही काळात मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका असल्याने मुंबईतील मुद्दे या अधिवेशनात केंद्रस्थानी राहिले. पावसाळी अधिवेशनाची संभाव्या तारीखही आज उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सांगितली आहे. 18 जुलैला पुढील अधिवेशन घेण्यात यावे अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.

भाषण विधानसभेतलं होतं पण शिवाजी पार्क मधलं भाषण झालं – देवेंद्र फडणवीस
Special Report | महापालिकेचे आयुक्त Iqbal Singh Chahal आयकर विभागाच्या टार्गेटवर -tv9