Special Report | अमृता फडणवीसांच्या निशाण्यावर ‘ते’ कोण? – Tv9

| Updated on: Mar 18, 2022 | 9:36 PM

आम्ही रोज शिमगा करायला सुरुवात केली तर महाराष्ट्रातही खूप खड्डे खोदलेले आहेत. त्यात कोण पडेल हे हळूहळू दिसेल, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.

मुंबई: भाजपच्या रंगात भेसळ आहे. ते भेसळीचे रंग वापरतात. त्यांच्या भेसळीच्या रंगांना आम्ही घाबरत नाही. त्यांचा रंग रेड असेल किंवा इतर काही असेल, होळी ही वर्षातून एकदा येते. पण यांचा शिमगा रोज सुरू आहे. आम्ही रोज शिमगा करायला सुरुवात केली तर महाराष्ट्रातही खूप खड्डे खोदलेले आहेत. त्यात कोण पडेल हे हळूहळू दिसेल, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. शिवसेना हा मोठा पक्ष आहे. शिवसेनेचं आव्हान मोठं आहे. ज्यांचं आव्हान मोठं असतं त्याच्याविरोधात बोंब मारली जाते. ज्यांचं आव्हान नाही, ज्यांच्या दंडात ताकद नाही, त्यांच्याकडून ही बोंब मारली जाते. भाजपच्या दंडात ताकत आहे असं त्यांना वाटतं. पण ते समोरून वार करत नाहीत. पाठिमागून करतात. अडीच वर्ष झाले ठाकरे सरकारला. अजून अडीच वर्ष जातील. आम्ही पुन्हा पाच वर्ष सत्तेत राहू, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

Special Report | अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणाचा Flashback – Tv9
Special Report | Nawab Malik सध्या बिनखात्याचे मंत्री -Tv9