Special Report | पंकजा मुंडेंवर ही वेळ का आली?

| Updated on: Jul 13, 2021 | 10:20 PM

मी लालची नाही. मला सत्तेची लालसा नाही. मला कुणालाही राजकारण संपवून राजकारण करायचं नाही, असं सांगतानाच मी तुमच्या सर्वांचे राजीनामे फेटाळून लावत आहे, असं पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं. पण असं असलं तरी पंकजा मुंडे यांच्यावर ही वेळ का आली?

खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्रं सुरू केलं आहे. त्यानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांनी समर्थकांशी संवाद साधला. मी लालची नाही. मला सत्तेची लालसा नाही. मला कुणालाही राजकारण संपवून राजकारण करायचं नाही, असं सांगतानाच मी तुमच्या सर्वांचे राजीनामे फेटाळून लावत आहे, असं पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं. पण असं असलं तरी पंकजा मुंडे यांच्यावर ही वेळ का आली? या पूर्वीही पंकजा मुंडे यांनी परळीमध्ये एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत भाजप नेत्यांवर आणि खासकरुन देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता.

Special Report | भाजपमध्ये पंकजा मुंडेंचं धर्मयुध्द कोणासोबत ?
Special Report | सचिन वाझेचा जेलमधला जबाब अनिल देशमुखांना अडकवणार?