‘दुष्काळी परिस्थितीबाबत वेळ आली तर सरकारनं विशेष अधिवेशन घ्यावं’, कुणी केली मोठी मागणी?
VIDEO | दुष्काळी परिस्थितीबाबत राज्यातील सरकारने वेळ पडली तर विशेष अधिवेशन घ्यावे, अशी मागणी माजी खासदार दत्ता मेघे यांनी केली आहे. इतकंच नाही तर सरकार मदत करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला
वर्धा, २० सप्टेंबर २०२३ | दुष्काळी परिस्थितीबाबत सरकारने वेळ पडली तर विशेष अधिवेशन घ्यावे, अशी मागणी माजी खासदार दत्ता मेघे यांनी केली आहे. ही मागणी करताना दत्ता मेघे असेही म्हणाले की, राज्यातील काही ठिकाणी पाऊस पाणी जास्त आले किंवा काही ठिकाणी कोरडा दुष्काळ अशी परिस्थिती असेल तर त्या ठिकाणी मदत करणं सरकारचं काम आहे. इतकंच नाही तर सरकार मदत करेल, अशी आशाही दत्ता मेघे यांनी व्यक्त केली. सावंगी (मेघे) येथे सावंगी येथील श्रीमती राधिकाबाई मेघे स्मृती ट्रस्टचा गणेशोत्सवनिमित्त आले असता त्यांनी यासंदर्भातील प्रश्नांना उत्तर देताना संवाद साधला. मराठवाडा, विदर्भातील अनेक ठिकाणी पाऊस नाही तर काही ठिकाणी जास्त पाऊस आहे. तिथे शेतकऱ्यांची मागणी काय, काय परिमाण होतात हे जाणून घेतले पाहिजे. वेळ आली तर सरकारने विशेष अधिवेशन घ्यावे. सध्या केंद्र सरकारचं अधिवेशन सुरू आहे. त्यात सरकारने असे प्रश्न तातडीने सोडवणं सरकारचं काम आहे, असे म्हणत सरकार ते कर्तव्य पार पाडतील, असा विश्वास दत्ता मेघे यांनी व्यक्त केला आहे.