Nagpur Metro ट्रेनचा वेग मंदावणार, ताशी 50 किलो मीटरवरुन 40 वर, काय आहे कारण?

| Updated on: Aug 31, 2023 | 4:53 PM

VIDEO | नागपूर मेट्रो रेल्वेच्या पुलाला काही ठिकाणी छोटे तडे गेल्यानं Nagpur Metro ट्रेनचा वेग ताशी 50 किलो मीटरवरुन 40 वर...मात्र मेट्रोच्या फेऱ्यांवर याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे मेट्रो प्रशासनाकडून प्रवाशांना माहिती

नागपूर, ३० ऑगस्ट २०२३ | नागपूर मेट्रो रेल्वेच्या पुलाला काही ठिकाणी छोटे तडे गेल्याची माहिती समोर येत आहे. न्यू मेट्रो स्टेशन ते खापरी मेट्रो ते गड्डीगोदम रेल्वेच्या पुलाला एक दोन ठिकाणी हे छोटे तडे गेल्याचे सांगितले जात आहे. यामुळे मेट्रो प्रशासनानं मेट्रो ट्रेनचा या मार्गावरील वेग कमी केल्याचे दिसून येत आहे. यामुळे मेट्रो प्रशासनाकडून मेट्रो ट्रेनचा ताशी 50 किलोमीटर वेग 40 वर आणला गेला आहे. मेट्रो प्रशासन नेमके तडे कशामुळे गेले याची कारणमीमांसा करणार असून त्यावर काम सुरू करण्यात आल्याचेही पाहायला मिळत आहे. तर मेट्रोच्या फेऱ्यांवर याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे मेट्रो प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

Published on: Aug 31, 2023 12:23 AM
‘Sharad Pawar यांनी राजकारणातून रिटायर व्हावं’, कुणी केलं मोठं वक्तव्य अन् दिला सल्ला?
INDIA आघाडीच्या बैठकीतील पंचपक्वान्नावरून मनसेचा ‘मविआ’वर निशाणा, Watch Video