अजित पवार मुखात? शरद पवार मनात? समर्थक संभ्रमात? दादा नेते अन् साहेब श्रद्धास्थान

| Updated on: Oct 09, 2024 | 11:08 AM

अजित पवार आपले नेते आहेत आणि शरद पवार आपले श्रद्धास्थान आहेत. पण आपण अपक्ष लढणार असल्याची भूमिका दादा समर्थक आमदार संजय शिंदे यांनी घेतली आहे. तर आम्ही अजित पवार यांच्यासोबत पण साहेब आमचे दैवत.. यामुळे समर्थकच संभ्रमात पडलेत.

पक्ष वेगवेगळे असले तरी आम्ही दादांच्या सोबत आहोत पण शरद पवार आमचे दैवत असल्याची भाषा अजित पवार यांच्या गटातील नेत्यांच्या तोंडी दिसतेय. जेव्हा राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हाही अजित पवार गटाने शरद पवार यांना दैवत मानन्याची भूमिका घेतली होती. मात्र लोकसभा येईपर्यंत दोन्ही बाजूने टीकेचे बाण डागले गेलेत. जानकरांच्या मते त्याचा फटका लोकसभेला बसल्यामुळे यंदा विधानसभा निवडणुकीला अजित पवार गटातील नेते शरद पवार यांच्यावर टीका करणं टाळताय. म्हणूनच अजित पवार गटातील काही नेते आमची अजित दादांना साथ म्हणतानाच शरद पवार आमचे दैवत असल्याचे म्हणताय. काहींना शरद पवार यांची साथ सोडल्याची खंत आहे तर काहींना पश्चताप… दरम्यान, दैवतांचा वाद फक्त विधानांपुरता मर्यादित नाही तर गेल्या सुनावणीत शरद पवार आमचे दैवत हे विधान सुप्रीम कोर्टात पोहोचलं. दोन्ही पक्ष वेगळे असले तरी अजित पवार गटातील नेते अशी वक्तव्य करून संभ्रम पसरवताय असा युक्तिवाद शरद पवार गटाच्या वकिलांनी केलाय.

Published on: Oct 09, 2024 11:08 AM
Haryana Assembly 2024 : विधानसभेत भाजपची हॅट्रिक, कसं जिंकलं हरियाणा? कोणता फॉर्म्युला ठरला हिट?
‘दादा म्हणजे बारामती, आमचं देव अन् काळजाचा तुकडा’, बारामतीत उमेदवारीसाठी राडा