रशियाची स्पुतनिक वी लस भारतीय बाजारात दाखल, रेड्डीज लॅबोरेटरीजच्या 170 कर्मचाऱ्यांनी घेतली लस
भारत सरकारनं कोरोना लसीकरणासाठी आपत्कालीन वापरासाठी आतापर्यंत तीन लसींना परवानगी देण्यात आली आहे. सीरमच्या कोविशील्ड, भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन आणि रशियाच्या स्पुतनिक वी लसीला परवानगी देण्यात आली आहे.
हैदराबाद: भारत सरकारनं कोरोना लसीकरणासाठी आपत्कालीन वापरासाठी आतापर्यंत तीन लसींना परवानगी देण्यात आली आहे. सीरमच्या कोविशील्ड, भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन आणि रशियाच्या स्पुतनिक वी लसीला परवानगी देण्यात आली आहे. स्पुतनिक वी लस भारतात दाखल झाली आहे. केंद्र सरकारनं स्पुतनिक वी लसीचा दर जाहीर केला आहे. स्पुतनिक वी लस भारतीय बाजारात दाखल झाली आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या 170 कर्मचाऱ्यांना स्पुतनिक वी लस देण्यात आली आहे. स्पुतनिक वी लस भारतीय बाजारपेठेत 1145 रुपयांना मिळणार आहे. तर दुसरीकडे कोविशील्ड लस खासगी रुग्णालयामध्ये 780 रुपयांना मिळणार आहे. तर कोवॅक्सिन लस भारतातील खासगी रुग्णालयात 1445 उपलब्द होणार आहे.