लालपरी चालकानो! मद्यपान करून ST बस चालवाल तर होणार कारवाई, काय बजावले आदेश?
VIDEO | मद्यप्राशन करून बस चालविणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व बसस्थानकावर चालकांची 'ब्रिथ अँनालॉयजर अल्कोहोल मशिन'च्या माध्यमातून तपासणी करण्यात येणार, मध्यवर्ती कार्यालयाचे आदेश
भंडारा, ४ सप्टेंबर २०२३ | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे बस चालक कर्तव्यावर जर मद्यप्राशन करून आढळल्यास आता त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई होणार आहे. याबाबत महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयानं आदेश बजावले आहे. राज्यातील सर्व बसस्थानकावर चालकांची ‘ब्रिथ अँनालॉयजर अल्कोहोल मशिन’च्या माध्यमातून तपासणी करण्यात येणार आहे. यात चालक मद्यप्राशन केल्याचं आढळून आल्यास त्या चालकावर महामंडळ पोलिसांच्या माध्यमातून तात्काळ फौजदारी कारवाई करणार आहे. बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अनेकदा रापम महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडं चालक मद्यप्राशन करून बस चालवतात आणि त्यामुळं अपघात वाढतात, अशा तक्रारी केल्या होत्या, त्या अनुषंगानं आता महामंडळानं हा निर्णय घेतलेला आहे.
Published on: Sep 04, 2023 03:54 PM