Breaking | एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट? काही कर्मचारी कामावर पुन्हा रूजू
मुंबई सेंट्रलमधून पहिली एसटी साताऱ्याच्या दिशेने रवाना झाली. तर 826 एसटी रस्त्यावर धावत असल्याचं एसटी प्रशासनाचं म्हणणं आहे. त्यामुळे एसटी कामगारांच्या संपात फूट पडल्याचं चित्रं निर्माण झालं आहे. आज 36 बसेस आम्ही विविध डेपोतून सोडल्या. 17 डेपोतून या बसेस सोडल्या. एकूण 900 लोकांनी एसटीतून प्रवास केला. खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट होऊ नये यासाठी आम्ही एसटी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत, असं एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितलं.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे चार दिवसानंतर पहिली एसटी बस धावली आहे. मुंबई सेंट्रलमधून पहिली एसटी साताऱ्याच्या दिशेने रवाना झाली. तर 826 एसटी रस्त्यावर धावत असल्याचं एसटी प्रशासनाचं म्हणणं आहे. त्यामुळे एसटी कामगारांच्या संपात फूट पडल्याचं चित्रं निर्माण झालं आहे. आज 36 बसेस आम्ही विविध डेपोतून सोडल्या. 17 डेपोतून या बसेस सोडल्या. एकूण 900 लोकांनी एसटीतून प्रवास केला. खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट होऊ नये यासाठी आम्ही एसटी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत, असं एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितलं.
राज्यातील काही भागात एसटी सेवा सुरू झाली आहे. मुंबई आगारातून आज दुपारी 2 वाजून 30 मिनिटाने एमएच 20 बीएल 3954 क्रमांकाची एसटी धावली. चालक आर. आर. देवरे आणि वाहक एस. एस. माने यांनी डेपोतून ही एसटी काढली. ही एसटी साताऱ्याच्या दिशेने निघाली होती. तर अक्कलकोट आगारातूनही काही बसेस सुटल्या. इस्लामपूर-वाटेगाव ही पहिली बस मार्गस्थ झाली. अक्कलकोट ते सोलापूर, सोलापूर ते अक्कलकोट अशा दोन ट्रीपही या बसच्या झाल्या. या एसटीतून 75 प्रवाशांनी प्रवास केला. तसेच रत्नागिरी विभागातील राजापूर आगारातून बुरुंबेवडी वस्ती हातदे ही एसटी रवाना झाली.