Akola | एसटी वाहक संतोष रजाणे यांचा नैराश्यातून मृत्यू, ST आंदोलनाचा धसका

| Updated on: Nov 14, 2021 | 5:57 PM

अकोला जिल्हातील अकोटमध्ये ST कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घढली. संतोष रजाने असं कर्मचाऱ्याचं नाव असून दीर्घ आजाराने त्यांचा मृत्यू झालाय.

अकोला जिल्हातील अकोटमध्ये ST कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घढली. संतोष रजाने असं कर्मचाऱ्याचं नाव असून दीर्घ आजाराने त्यांचा मृत्यू झालाय. मागील आठ दिवसांपासून बस डेपोसमोर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रजाणे मानसिक तणावाखाली असल्याचे सांगण्यात येतेय. अकोला जिल्हातील अकोट बसस्थानकावर संतोष रजाने (43 वर्षे) मागील अनेक वर्षांपासून कर्तव्यावर होते. ते दीर्घ आजाराने त्रस्त होते. गेल्या 15 दिवसांपासून वाहक संतोष रजाने यांची प्रकृती खालावली होती. प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Breaking | महागाईविरोधात मुंबईत काँग्रेसचा एल्गार, काँग्रेसतर्फे भव्य पदयात्रा जनजागरण अभियान
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 14 November 2021