Anil Parab | एसटी कर्मचाऱ्यांविरेधात अवमान याचिका दाखल करणार – अनिल परब

| Updated on: Nov 09, 2021 | 4:47 PM

गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरुच आहे. महागाई भत्ता आणि घरभाडे वाढीबाबतची मागणी मान्य करण्यात आली आहे. मात्र एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीबाबत अद्याप तोडगा निघू शकला नाही.

गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरुच आहे. महागाई भत्ता आणि घरभाडे वाढीबाबतची मागणी मान्य करण्यात आली आहे. मात्र एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीबाबत अद्याप तोडगा निघू शकला नाही. अशावेळी राज्य सरकारकडून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात असल्याची माहिती अनिल परब यांनी दिलीय.

एसटीचा संप सुरु आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी व्यवस्था करत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या 3 मागण्या आहेत, त्या मान्य केल्या गेल्या होत्या. मात्र, विलिनीकरणासंदर्भात नवी मागणी केलीय. हायकोर्टानं दिलेल्या आदेशानंतर समिती स्थापन केली आहे. ही समिती पुढील विचारविनिमय करेल. हायकोर्टानं हा संप बेकायदेशीर आहे असं जाहीर करुनही हा संप सुरुय. कोर्टानं सूचना केलीय की अवमान याचिका दाखल करु शकता. त्यानुसार एसटी महामंडळ संपाबाबत अवमान याचिका दाखल करत आहे, असंही अनिल परब यांनी सांगितलं.

Fadnavis VS Malik | देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक यांच्यातील आरोप प्रत्यारोप
Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 4 PM | 9 November 2021