Mumbai | ‘आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरुच’ – एसटी कर्मचारी
आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम असून, काहीही झाले तरी आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. रात्री साडेबाराच्या सुमारास आझाद मैदानात पावसाने हजेरी लावली, मात्र भर पावसातही आंदोलन सुरूच होते.
आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम असून, काहीही झाले तरी आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. रात्री साडेबाराच्या सुमारास आझाद मैदानात पावसाने हजेरी लावली, मात्र भर पावसातही आंदोलन सुरूच होते. आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम असून पाऊस येवो, वादळ येवो आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत माघार घेणार नसल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली. आमच्या आंदोलनाची दखल सरकारला घ्यावीच लागेल, एसटी विलीनीकरण हाच एकमेव पर्याय असल्याचेही यावेळी एसटी कर्माचाऱ्यांनी म्हटले.