VIDEO : Nanded | नांदेडमध्ये उपोषणादरम्यान प्रकृती खालावलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू
आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. संपामुळे एसटी सेवा बंद असल्याने प्रवांशाचे हाल होत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप सुरू आहे. मात्र, या संपादरम्यान नांदेडमध्ये एसटी कर्मचाऱ्याचा बळी गेला आहे.
आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. संपामुळे एसटी सेवा बंद असल्याने प्रवांशाचे हाल होत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप सुरू आहे. मात्र, या संपादरम्यान नांदेडमध्ये एसटी कर्मचाऱ्याचा बळी गेला आहे. आंदोलनात सहभागी असलेल्या वाहकाचा मृत्यू आला आहे. आंदोलनादरम्यान काल हृदयविकाराचा झटका त्यांना आला होता. शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव दिलीप विठ्ठलराव वीर असे आहे.