Special Report | एसटीच्या संपावरुन ‘जनशक्ती’चे कार्यकर्ते आक्रमक, अनिल परबांच्या घराबाहेर शाईफेक
एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आता चिघळण्याच्या मार्गावर असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरुन बेमुदत संपाला अनेक संघटनेनं पाठिंबा जाहीर केला आहे. त्यातील जनशक्ती संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आता चिघळण्याच्या मार्गावर असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरुन बेमुदत संपाला अनेक संघटनेनं पाठिंबा जाहीर केला आहे. त्यातील जनशक्ती संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घराबाहेर राडा घातला. परब यांच्या घरावर शाई फेकण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांनी केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं. तेव्हा रस्त्यावर झोपून त्यांनी आपला निषेध व्यक्त केला. त्यावेळी पोलिसांनी जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. (ST Employee Strike : Janshakti activists throw ink on Anil Parab’s house)
Published on: Nov 23, 2021 09:00 PM