एसटी कर्मचाऱ्यांनी 10 मार्चच्या आत कामावर यावं; अनिल परब यांचं आवाहन

| Updated on: Mar 04, 2022 | 3:00 PM

एसटी कर्मचाऱ्यांनी 10 मार्चच्या आत कामावर यावे. अन्यथा सारे पर्याय खुले आहेत, असा इशारा शुक्रवारी परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

मुंबईः एसटी कर्मचाऱ्यांनी 10 मार्चच्या आत कामावर यावे. अन्यथा सारे पर्याय खुले आहेत, असा इशारा शुक्रवारी परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना दिला. एसटी महामंडळाचे (MSRTC) राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करणे शक्य नाही, असे त्रिसदस्यीय समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य सरकारने हा अहवाल न्यायालयात (Court) मांडला. त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी हा अहवाल आज विधानसभेत पटलावर ठेवला. अपेक्षेप्रमाणे दुपारी परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा कामावर यावे आणि आपली सेवा सुरू करावी, असे आवाहन त्यांनी केले.

Published on: Mar 04, 2022 03:00 PM
Russia Ukraine war: नाशिकचे 14 विद्यार्थी अद्यापही मायदेशी परतले नाहीत
OBC आरक्षणासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार