Special Report | ST विलीनीकरणाचा अहवाल बाजूनं की विरोधात ?

Special Report | ST विलीनीकरणाचा अहवाल बाजूनं की विरोधात ?

| Updated on: Feb 22, 2022 | 8:55 PM

कोर्टाने आजही एसटी कर्मचाऱ्यांना तारीख पे तारीख देत सुनावणी शुक्रवारी होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर राज्यातलं वातावरण पुन्हा तापलं आहे. कोर्टातील सुनावणीवर बोलताना एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadvarte) सरकारवर भडकल्याचे दिसून आले.

YouTube video player

मुंबई : एसटीच्या अहवालावर (St Merger) सुनावणी पार पडल्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारवर आगपाखड केली आहे. कोर्टाने आजही एसटी कर्मचाऱ्यांना (St Worker Strike) तारीख पे तारीख देत सुनावणी शुक्रवारी होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर राज्यातलं वातावरण पुन्हा तापलं आहे. कोर्टातील सुनावणीवर बोलताना एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadvarte) सरकारवर भडकल्याचे दिसून आले. सरकारला एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यायचा नाही. राज्य सरकारच्या दिरंगाईमुळे एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही, असा थेट आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारवर केला आहे. आम्ही न्यायलयाला सांगितलं ही संपाची याचिका नसून दुखवट्याची आहे. आम्ही सांगितलं आमचा फंडामेंटल राईट आहे की रिपोर्ट वाचायला मिळणं. त्यावर न्यायालयाने सरकारी पक्षाला आम्हाला रिपोर्ट देण्याचे आदेश दिल्याचेही सदावर्ते यांनी सांगितले.

Tet Exam Scam | TET परीक्षांमध्ये अपात्र शिक्षकांचा आकडा वाढण्याची शक्यता, DCP भाग्यश्री नवटक्के
Special Report | दिशा प्रकरणात Sachin Vaze कनेक्शन ?