नागपूर विभागात लालपरी धावायला सुरुवात, प्रवाशांचा वाढता प्रतिसाद
संपावरील एसटी कर्मचारी सेवेत रुजू व्हायला सुरुवात झाली आहे. काल नागपूर विभागातील 95 संपकरी कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले. 199 एसटी बसद्वारे आता प्रवासी वाहतूक सुरू झाली.
संपावरील एसटी कर्मचारी सेवेत रुजू व्हायला सुरुवात झाली आहे. काल नागपूर विभागातील 95 संपकरी कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले. 199 एसटी बसद्वारे आता प्रवासी वाहतूक सुरू झाली. बसची संख्या वाढत असल्याने प्रवाशांना दिलासा मिळत आहे. तर दुसरीकडे लालपरी आता वेगाने रस्त्यावर येण्याच्या तयारीत आहे.