ST Workers Strike | संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची मागणी
चंद्रपुरातील 14 संपकरी कर्मचाऱ्यांचं निलंबन आज करण्यात आलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा आगार, चंद्रपूर आगार आणि विभागीय कार्यशाळा या 3 घटकातील कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेला बेमुदत संप अद्यापही सुरुच आहे. अशावेळी राज्य सरकारनं संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात पहिली कारवाई केलीय. चंद्रपुरातील 14 संपकरी कर्मचाऱ्यांचं निलंबन आज करण्यात आलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा आगार, चंद्रपूर आगार आणि विभागीय कार्यशाळा या 3 घटकातील कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे.आतापर्यंत 45 आगारांमधील 376 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.