राज्यात राक्षसी वृत्तीचे सरकार; एसटी कर्मचाऱ्यांच्या गैरसोईवरून पडळकरांचा संताप
आपल्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावरून पुन्हा एकदा भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
मुंबई – आपल्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावरून पुन्हा एकदा भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार आणि मुंबई महापालिका भिकारी आहेत, आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातून आलेल्या कर्मचाऱ्यांचे मुंबईत आंदोलन सुरू आहे. मात्र महापालिका आणि सरकारकडून त्यांना साधे पिण्यासाठी पाणी देखील देण्यात आले नाही. महापालिकेच्या 79 हजार कोटींच्या ठेवी आहेत, मग त्याचा उपयोग काय? अशा शद्बात पडळकर यांनी टीका केली आहे. सरकारची ही राक्षसी वृत्ती आहे, मात्र त्यांनी लक्षात ठेवावे कितीही गौरसोय झाली तरी आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा देखील यावेळी पडळकर यांनी दिला आहे.