ST Employee Strike | परबांच्या बंगल्यावर जाऊन खणा-नारळानं ओटी भरणार – गोपीचंद पडळकर
कोणत्याही परिस्थितीत परब यांच्या बंगल्यावर आम्ही धडक देणारच… असा निर्धार व्यक्त करत एसटी कामगारांनी संपूर्ण आझाद मैदान परिसर दणाणून सोडला.
मुंबई: ज्योतिबाच्या नावानं चांगभलं… बिरोबाच्या नावानं चांगभलं… खंडोबाच्या नावानं चांगभलं… अशी घोषणाबाजी करत एसटी कामगारांनी संपूर्ण आझाद मैदान दणाणून सोडलं. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात राज्य सरकार चालढकलपणा करत आहे. त्यामुळे आम्ही परिहन मंत्री अनिल परब यांना साडी चोळी देणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत परब यांच्या बंगल्यावर आम्ही धडक देणारच… असा निर्धार व्यक्त करत एसटी कामगारांनी संपूर्ण आझाद मैदान परिसर दणाणून सोडला. हजारोच्या संख्येने एसटी कामगार एकवटल्याने या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.